पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकी फोननंतर मुंबई पोलिसांकडून धमक देणाऱ्याचा कसून शोध घेतला. आता या प्रकरणी अंबोली पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. हा फोन करणाऱ्या महिलेने नरेंद्र मोदींना मारण्याचा प्लॅन झाल्याचा दावा केला आहे. तर या फोन कॉल प्रकरणी शितल चव्हाण नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
धमकी प्रकरणातील महिलेला अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महिलेला अंबोली पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेच्या विचारपूस दरम्यान कोणतीही संशयित माहिती समोर आली नाही. कौटुंबिक वादामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या महिलेने हा फोन केल्याने प्राथमिक पोलिस तपासात ही बाब समोर आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मोदींना 6 वर्षात तीन धमक्या आल्या
2023: हरियाणातील एका व्यक्तीने मोदींचा व्हिडिओ व्हायरल करताना गोळ्या घालण्याची धमकी दिली होती. व्हिडिओमध्ये तरुणाने स्वत:ला हरियाणाचा आणि सोनीपतच्या मोहना गावचा रहिवासी असल्याचे सांगितले होते. व्हिडीओमध्ये म्हणाला होता की, पंतप्रधान मोदी माझ्यासमोर आले तर मी त्यांना गोळ्या घालेन. 2022: झेवियर नावाच्या व्यक्तीने पंतप्रधान मोदींना धमकी दिली होती. झेवियर यांनी केरळ भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांना पाठवलेल्या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देत लिहिले होते, मोदींची अवस्था राजीव गांधींसारखी होईल. त्यावेळी पंतप्रधान केरळ दौऱ्यावर होते. त्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली. 2018: महाराष्ट्रातील मोहम्मद अलाउद्दीन खान नावाच्या व्यक्तीने त्यांच्या फेसबुक पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगून त्याने देशातील पाच प्रमुख शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याची चर्चा होती. या व्यक्तीने आयएसआयएस या प्रतिबंधित संघटनेच्या झेंड्याचा फोटोही पोस्ट केला होता.
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात काल रात्री एक फोन आला. हा फोन आल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडाली. कारण फोन करणाऱ्या व्यक्तीने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं. त्या कॉलरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा कट रचल्याची धमकी दिली. बुधवारी रात्री 9 च्या सुमारास नियंत्रण कक्षाला धमकीचा हा फोन आला. मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली. या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे
दिल्ली/06:- गडचिरोली आदिवासी जिल्ह्यातील दुर्गम भागातील एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम जाजावंडी गावातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दिल्ली येथे गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देण्यात आला. श्री बेडके यांना रजत पदक व ५० हजार रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगाची चित्रफीत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह तसेच शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी श्री बेडके यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून त्यात कोल्हापूर येथील सागर बगाडे व गडचिरोली जिल्ह्यातील एम. ए. बि. एड. असलेले मंतैय्या बेडके यांचा समावेश आहे.